संजय राऊतांनी मागितली सरन्यायाधीशांची बिनशर्त माफी...

Foto
मुंबई : उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली आहे. राऊत यांनी सुप्रीम कोर्टात  प्रतिज्ञापत्र राऊत यांनी म्हटले आहे की, ते बिनशर्त, पूर्णपणे आणि स्वेच्छेने माफी मागत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान सूचनेनंतर संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. 

 आपल्या माफीनाम्यात, राऊत यांनी न्यायालयाच्या प्रतिष्ठेबद्दल आणि अधिकाराबद्दल आदर व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा जपण्याचे महत्त्व त्यांना समजते. न्यायालयाचा अपमान करण्याचा किंवा न्यायपालिकेची प्रतिष्ठा, स्वातंत्र्य किंवा अधिकार कमी करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता.

सर्वोच्च न्यायालयाने १७ नोव्हेंबर रोजी समन्स बजावले
संजय राऊत यांनी प्रतिज्ञापत्र सादर करूनही, हे प्रकरण अजूनही संपलेले नाही. ही माफी न्यायालयाच्या नोंदींमध्ये नोंदवली गेली नाही. बुधवारच्या सुनावणीदरम्यान राऊत यांच्या वतीने कोणतेही वकील हजर झाले नव्हते. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊत यांना समन्स बजावले.

कोर्टाने त्यांना १७ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता त्यांना स्वत: कोर्टात हजर रहावे लागणार आहे. या माफीनाम्यावर कोर्ट त्याच दिवशी विचार करणार आणि निर्णय देणार आहे.
खासदार संजय राऊत यांनी अल्बानियामधील हिंसक आंदोलनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी, तेथील लोकांनी भ्रष्ट पंतप्रधानांना पाठिंबा दिल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाला आग लावली आणि सरकारी इमारतींवर हल्ला केला, असे लिहिले होते. या पोस्टमुळे राजकीय प्रतिक्रिया उमटली, भाजप त्यांच्यावर अराजकता पसरवणे, हिंसाचार भडकवणे आणि न्यायालयाला धमकी दिल्याचा आरोप केला. यानंतर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

नोटीसनंतर माफी मागितली
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊत यांना अवमान नोटीस बजावली होती. त्यानंतर राऊत यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून माफी मागितली.